परळीच्या भूमिपुत्राच्या कलेचं कौतुक
चित्रकार श्रीकांत दहिवाळ यांचे चित्र दिल्ली येथील चित्रप्रदर्शनात झळकणार
परळी(प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनच्या वतीने दिल्ली येथे दि.१७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनात परळी येथील प्रसिध्द चित्रकार श्रीकांत दहिवाळ यांच्या चित्रांची निवड झाली आहे.या चित्रप्रदर्शनात दहिवाळ यांच्यासह ६५ चित्रांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनच्या वतीने डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर,१५ जनपथ रोड, नवी दिल्ली-०१ येथे राष्ट्रीय पातळीवरील चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.या चित्र प्रदर्शनाचे दि.१७ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय दहिवाळ गुरुजी यांचा चित्रकलेचा वारसा त्याच योग्यतेने जोपासणारे व पुढे नेणारे श्रीकांत दहिवाळ यांचे चित्र पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमीत्त देशभरातील चित्रकारांकडुन मागवण्यात आलेल्या चित्रांच्या प्रदर्शनात प्रदर्शित होणे ही परळीकरांसाठी अभिमानाची बाब आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा