घर नावावर केलं नाही...माईचा काढला काटा....!

मुलानेच केली आईची निर्घृण हत्या; परळी तालुक्यातील भोजनकवाडीत खळबळजनक घटना



परळी वैजनाथ| प्रतिनिधी....
          परळी तालुक्यातील भोजनकवाडी गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्म दिलेल्या आईला केवळ घर नावावर करून देत नाही म्हणून तिच्या मुलानेच  दगडाने डोक्यात मारून निर्घृण हत्या केल्याची घटना दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता उघडकीस आली.या प्रकरणी पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,आरोपी चंद्रकांत कांगणे वय अंदाजे 26 वर्ष हा आपल्या आईकडे (मयत सुनंदा ज्ञानोबा कांगणे, वय अंदाजे 50 वर्ष, रा. भोजनकवाडी ) सतत घर नावावर करून देण्याची मागणी करत होता. मात्र, मयत हिने घर तिच्या नावेच ठेवले. त्यामुळे आरोपी चंद्रकांत याने रागाच्या भरात दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता आईच्या डोक्यात कुरुंदाचा दगड घालून गंभीर दुखापत केली. जखम गंभीर असल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गु.र.नं. 405/2025, कलम 103(1) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी मुलाला पोलीसांनी अटक केली आहे.अधिक तपास पो.नि. सय्यद  हे करीत आहेत.           
      दरम्यान, जन्मदात्री आईसारख्या मायेच्या व्यक्तीची केवळ मालमत्तेच्या वादातून घडलेली हत्या ही समाजातील नैतिक अधःपतनाचे उदाहरण असुन, या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !