युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

Congratulations!!!!!!!!!

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयी !

Vice President Election Result : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज (मंगळवार) मतदान प्रक्रिया पार पडली. सी.पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीचे ४५२ मतं मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मतं मिळाली.

भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात ७ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे, एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. तर ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण ७६८ खासदारांकडून मतदान झाले.

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजता संपले. मतदान संपल्यानंतर, काँग्रेसने सांगितले होते की उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षात एकजूट राहिली. सर्व ३१५ खासदारांनी मतदान केले आहे. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांची १५ मतं फुटल्याचे समोर आले आहे.


कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन ? -

सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. तमिळनाडूत जन्मलेले सी.पी. राधाकृष्णन भाजपाचे मोठे नेतेही आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूर येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केले होते. ते कोइमतूर मतदारसंघातून 1998 आणि 1999 मध्ये लोकसभेवर दोनदा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

२००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठविला होता. सी.पी. राधाकृष्णन यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम केलं आहे. ते दोन वेळा लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत. राधाकृष्णन 1973 पासून आरएसएस आणि जनसंघाशी संबंधित आहेत.

फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले, तसेच मार्च ते जुलै २०२४ दरम्यान तेलंगाना आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ दरम्यान पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. ३१ जुलै २०२४ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या