युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

Education:संस्कृत दिन व शिक्षक दिन कार्यक्रम....

 शिक्षकांनी प्राचीन मूल्य संस्कारांचा आदर्श  जपावा !

अभ्यासक डॉ.नरेंद्र शिंदे यांचे विचार 

  Parli Vaijnath:परळी वैजनाथ दि.९---

           ‌भारताचा प्राचीन वैभवशाली काळ हा गुरु- शिष्यांचे पवित्र नाते जपणारा व मूल्याधिष्ठित  समाजाची निर्मिती करण्यास पूरक होता.  प्राचीन संस्कृत वाङ्मयात प्रतिपादित केलेल्या विचारांची जोपासना केल्यास  सद्ययुगात मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती  होऊ शकते.यासाठी शिक्षकांनी प्राचीन मूल्य संस्कारांचा आदर्श जपावा,  असे आवाहन अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र शिंदे यांनी केले. 

    Vaidyanath College: येथील वैद्यनाथ महाविद्यालयात काल (दि.८) संयुक्तरित्या संस्कृत दिन व शिक्षक दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. जगतकर हे होते. तर व्यासपीठावर विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य डॉ. पी. एल. कराड,उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. एच.डी. मुंडे पर्यवेक्षक डॉ. एन. एम. आचार्य समन्वयक प्रा. यु. आर. कांदे आदींची उपस्थिती होती. 

   Sanskritdin:  यावेळी डॉ. शिंदे यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व विशद करून प्राचीन वाङ्मयात गुरु-शिष्यांचे नाते  मौलिक स्वरूपाचे होते. त्यामुळेच तो काळ भौतिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होता. त्या दृष्टीने सद्ययुगात शिक्षकांनी मानवी मूल्यांनी परिपूर्ण करावे. कारण समाज व राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकाचे सर्वात मोठे योगदान असते. मूल्य संस्कारांची जोपासना करणारा शिक्षक हाच विद्यार्थी व समाजाला नवी दिशा देऊ  शकतो, असे उद्गार काढले.    

     अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जे.व्ही. जगतकर यांनी शिक्षक हा नव्या युगाचा शिल्पकार असल्याचे प्रतिपादन केले. प्रारंभी मान्यवरांनी तत्त्वज्ञ शिक्षक व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या भित्तिपत्रकांचे  विमोचन करण्यात आले. तर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या  विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण  करण्यात आले. यावेळी संकेत मोकाशे, पूजा सदरे, साक्षी गित्ते या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. 

             याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापकांचा  सत्कार केला व सर्वांप्रती दीर्घायुष्य  चिंतीले.

प्रास्ताविक डॉ. आचार्य यानी केले.  सूत्रसंचालन काशिनाथ मरगीळ व गौरव पुजारी यांनी केले , तर आभार मयुरेश दुरुगकर व आदित्य गित्ते यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या