परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

Pankaja Munde:आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नका

 ना.पंकजा मुंडे यांनी वांगदरीत जाऊन केले भरत कराड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नका

लातूर ।दिनांक १८।

    राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच्या निराशेपोटी आत्महत्या केलेल्या भरत महादेव कराड यांच्या कुटुंबाची आज वांगदरी येथे जाऊन भेट घेतली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कराड कुटुंबीयांच सांत्वन करत पंकजा मुंडे यांनी त्यांना धीर दिला.


ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच्या निराशेपोटी भरत महादेव कराड यांनी काही दिवसापूर्वी मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. दरम्यान भरत यांच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलेले उपोषण पंकजाताईंच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले.

कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार

------

यावेळी माध्यमाशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्या लेकरांचं ओबीसी आरक्षण जाणार या नैराश्यातून भरतने आत्महत्या केली, ही खूप वाईट घटना आहे. आज मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्याच्या मुलाना कुरवाळलं, त्याच्या पत्नीला धीर दिला. लोकनेते मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मदत करताना या हाताचं त्या हाताला सांगायचं नाही. म्हणून कराड कुटुंबाला काय देणार, हे सांगणार नाही. मात्र मी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभी आहे. मी या विषयी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार आहे. इतराना मदत केली तीच मदत कराड कुटुंबीयांना देखील देण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!