2 लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा गांजा पकडला....
“ऑपरेशन थंडर”अंतर्गत मोठी कारवाई : 12 किलो 186 ग्रॅम गांजा जप्त, एक अटक
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बीड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने “ऑपरेशन थंडर” अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मोठी कारवाई करत 12 किलो 186 ग्रॅम गांजा जप्त केला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत ₹2,43,720/- इतकी आहे.
घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकाजवळील रेल्वे पटरीच्या पुढील भागात 08 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 1:05 वा. ही कारवाई करण्यात आली.पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घाटनांदूर परिसरात गांजाचा साठा असल्याची खात्री करून पंचासमक्ष आरोपीच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 12 किलो 186 ग्रॅम गांजा मिळून आला.जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत ₹2,43,720/- इतकी आहे. यासंदर्भात पंचनामा करुन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.: 0334/2025, कलम 8(c), 20(b) NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी निहाल रामभाऊ गंगणे, रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई यास अटकक करण्यात आली आहे.पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. रामचंद्र केकान, राख, विष्णू सानप,दिलीप गीते आणि पो.ना. गोविंद भताने यांनी ही यशस्वी कारवाई केली.या कारवाईमुळे अवैध अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर आळा बसण्याची शक्यता असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा