पत्रकार बालाजी जगतकर यांना पितृशोक
श्रावणराव जगतकर यांचे निधन
परळी प्रतिनिधी - परळी येथील सुपरिचित व्यक्तिमत्व श्रावणराव नामदेवराव जगतकर वय 75 यांचे अल्पशा आजाराने दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1, 30 दरम्यान निधन झाले.
श्रावणराव जगतकर मितभाषी मनमिळावू स्वभावाचे व पॅंथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी समाजकार्यात हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. विद्युत निर्मिती थर्मल पावर स्टेशन येथे ते नोकरीला लागल्यानंतर त्यांनी आपली समाज सेवा व कार्य चालूच ठेवले होते. त्यानंतर विद्युत वितरण कंपनीत त्यांनी आपली सेवा दिली व त्याच ठिकाणी सेवानिवृत्त झाले. त्यांनी धार्मिक कार्यात सतत पुढाकार घेतला होता. त्यांच्याजाने एक मोठी पोकळी परळी शहरात निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले पत्रकार बालाजी जगतकर व दुसरा मुलगा राजू जगतकर बुलेट रेल्वे कतार येथे मॅनेजर आहे.एक मुलगी व सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा