8 नोव्हेंबर रोजी मोंढा मैदानावर कामगारनेते कॉ डी एल कराड यांची जाहीर सभा
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे परळीत होणार राज्यस्तरीय अधिवेशन
८ व ९ नोव्हेंबर ला फेडरेशनचे शिर्षस्थ नेतेगण, राज्यभरातील पदाधिकारी व सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित
8 नोव्हेंबर रोजी मोंढा मैदानावर कामगारनेते कॉ डी एल कराड यांची जाहीर सभा
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्यस्तरीय अधिवेशन परळीत होणार आहे. ८व ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यभरातील पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन व संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु आहे.
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) ची बैठक पार पडली.बैठकीस सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, वर्धा, अकोला, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील फेडरेशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत फेडरेशन अधिवेशन तयारी बाबत आढावा घेण्यात आला.महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्यस्तरीय अधिवेशन ८ व ९ नोव्हेंबरला परळीत होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात जन सुरक्षा विधेयक रद्द करा, चार कामगार संहिता आणि 12 तासांचा कामाचा दिवस रद्द करा, सार्वजनिक आरोग्याचे खाजगीकरण थांबवा आणि आरोग्याच्या बजेट मध्ये वाढ करा,आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, योजना कर्मचाऱ्यांची एकजूट कायम करा, आदी मागण्यांचे ठराव पारित करण्यात येणार आहेत.
परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय अधिवेशनासाठी फेडरेशनच्या एकूण सभासद संख्येनुसार 75 सभासदांच्या मागे 1 प्रतिनिधी याप्रमाणे 200 प्रतिनिधी निश्चित करण्यात आलेले असुन त्याप्रमाणे सातारा 12, नांदेड 10, सिंधुदुर्ग 12, सांगली 6, सोलापूर 40, धुळे - नंदुरबार 5, नाशिक 5, कोल्हापूर 18, जळगाव 2, औरंगाबाद 9, भंडारा 2, जालना 4, पालघर 5, वर्धा 7, मुंबई 5, बुलढाणा 12, चंद्रपूर 5, नागपूर -11, अमरावती 6, पुणे 4, बीड 15, नगर 4, यवतमाळ 4, अकोला 7 असे एकूण 210 राज्यस्तरीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला आशा वर्कर्स यूनियनच्या अखिल भारतीय सरचिटणीस मधुमीता बडोपाध्याय,सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड,सिटू चे सरचिटणीस एम. एच. शेख, आशा वर्कर्स यूनियनच्या अध्यक्षा आनंदी आवघडे,आशा वर्कर्स यूनियनच्या सरचिटणीस पुष्पा पाटील,कोषध्यक्षा अर्चना घुगरे आदी फेडरेशनचे शिर्षस्थ नेतेगण उपस्थित राहणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रवचन मंडप,वैद्यनाथ मंदिर ते मोंढा मैदान या मार्गावर रॅली निघणार आहे. त्यानंतर मोंढा मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
परळीत होणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी सध्या करण्यात येत आहे अशी माहिती बीड जिल्हा सरचिटणीस किरण सावजी यांनी दिली आहे.परळीतील अधिवेशन यशस्वी व अविस्मरणीय करण्याठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा