अभिनंदनीय: कामगार कल्याण मंडळाची स्पर्धा...

महिला भजन स्पर्धेत परळीचा संघ प्रथम




परळी  (प्रतिनिधी): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या  महिला भजन स्पर्धेत परळी येथील  भजनी संघाने  पहिले बक्षीस पटकाविला. निलंगा  द्वितीय तर धाराशिव येथील भजनी संघाने तृतीय बक्षीस मिळविले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

धाराशिव येथील कामगार कल्याण भवनमध्ये मंगळवारी ( दि. ७) या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत लातुर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील ८ भजनी मंडळानी सहभाग घेतला. यामध्ये कामगार कल्याण भवन धाराशिव,  कामगार कल्याण भवन लातुर, कामगार कल्याण केंद्र उदगीर, कामगार कल्याण केंद्र बीड, कामगार कल्याण केंद्र अंबाजोगाई, कामगार कल्याण केंद्र परळी, कामगार कल्याण केंद्र निलंगा, कामगार कल्याण केंद्र कळंब या संघांचा सहभाग होता.स्पर्धेत प्रत्येक मंडळास भजन सादरीकरणासाठी २५ मिनिटांचा वेळ देण्यात आला.  मंगवारी सायंकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून किर्तनकार प्रियंका आडसुळ व प्रमुख पाहूणे म्हणून भागवताचार्य श्रीकांत महाराज लाडेगावकर, पोलीस उपनिरीक्षक अनघा गौरे, कामगार संघटनेचे शरद राऊत यांची उपस्थित होती.

 कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उत्कृष्ट गायक, पेटीवादक, मृदंगवादक व तालसंच यासाठी ही वैयक्तीक बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !