परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी महाविकास आघाडीच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने
डॉ.संपदा मुंडे यांच्या प्रकरणातील आरोपींना कडक शासन करा
परळी, प्रतिनिधी....
सातारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
परळी येथील महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारला परळी तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात फलटण येथील अत्याचार पीडित डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक खून आहे. त्यातही कळस म्हणून मुख्यमंत्री स्वतः फलटणमध्ये सभा घेऊन संशयाच्या भवत्यामध्ये अडकलेल्या माजी खासदाराला भाषणामधून निर्दोष घोषित करतात. एकीकडे आरएमएस भाजप स्त्रियांचा सन्मानाच्या नावावाली विविध योजना राबवत आहे. पण हा फक्त दिखावा असून बार एस एस / भाजपशी संलप्रित प्रस्थापित सरंजामी गुंड प्रवृत्तीच्या नेत्याना राजकीय पाठबळ देऊन पोलिसी बळाचा गैरवापर करून महिलांप्रती असलेली त्यांची बुरसटलेली मनुवादी मानसिकता सिद्ध करत आहे.डॉ. संपदा मुंडे यांचा प्रश्न हा फक्त एका जातीचा किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर या घटनेमुळे घर सोडून शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर राहणाऱ्या महिलांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भीती निर्माण झालेली आहे. ही राजकीय प्रशासकीय गुंडगिरी थांबवून पारदर्शक चौकशीसाठी जिल्ह्याबाहेरील पोलीस आरोग्य विभागातील बरिष्ठ अधिकारी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी महिला प्रतिनिधींचा या चौकशी समितीमध्ये समावेश असावा. ही चौकशी फक्त आत्महत्या एवढ्या पुरती मर्यादित न ठेवता या घटनेमध्ये जे विविध पैलू समोर येत आहेत या पैलूंच्या सर्वांगाने चौकशी करणे गरजेचे आहे. व पिडितेची बदनामी करून तपास भरकटवण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावे असे नमूद असलेले निवेदन देण्यात आले. या निवेदनात1. विघडलेली कायदा सुव्यवस्था पुन्हा कायद्याच्या चौकटीत आणा,2. SIT ची घोषणा केल्याप्रमाणे तात्काळ निवेदनात मागणी केल्याप्रमाणे अधिकारी नेमून चौकशी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.
या निदर्शनात कॉ. एस.घाडगे सर, काँग्रेस नेते ॲड अनिल मुंढे , शिवसेना नेते नारायण सातपुते, राष्ट्रवादीचे नेते उत्तम माने, प्रा.खाडे सर, जिल्हा उपाध्यक्ष देवराव लुगडे ,तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,शहर अध्यक्ष अँड.जीवन देशमुख, काँग्रेस अध्यक्ष बहादुर भाई,शिवसेनाचे जगन्नाथ सोळंके,शशी चौधरी,सुभाष देशमुख, इतेशाम खतिब,किरण सावजी,फिरोज सय्यद,दीपक शिरसाट,रणजीत देशमुख,वैजनाथ गाडेकर, इमरोज खान, महारुद्र कदम,विष्णू नागरगोजे, बद्दर भाई,बाळासाहेब गीते,रसूल खान, फरकुंद अली,फारूक, एडवोकेट अर्जुन सोळंके रमेश ढाकणे अदी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी या निदर्शनात सहभागी झाले होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा