परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
धनंजय मुंडे यांचे ईडब्ल्युएस संदर्भातील वक्तव्य कुणासाठी- बहादुरभाई
परळी (प्रतिनिधी)
दोन दिवसांपूर्वी बीड येथे पार पडलेल्या ओबिसी महाएल्गार मेळाव्यात माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी ओबिसी प्रवर्गात ईडब्ल्युएसची घुसखोरी होत असल्याचे शब्द वापरुन त्यास विरोध केला होता.आ.धनंजय मुंडे यांचे हे शब्द कोणासाठी वापरले हे जाहिर करावे असे आव्हान कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी केले आहे.
दोन दिवसांपुर्वी बीड येथे ओबिसींचा महाएल्गार मेळावा पार पडला.या मेळाव्यात आपली भुमिका मांडताना आ.धनंजय मुंडे यांनी ओबिसी प्रवर्गात ईडब्ल्युएस मध्ये घुसखोरी हा शब्द वापरुन यास विरोध दर्शवला होता.आ.मुंडे यांच्या वक्तव्यामुळे अल्पसंख्यांक व खुल्या प्रवर्गातील इतर समाजात संभ्रम निर्माण झाला असुन त्यात नेमकी कोणाची घुसखोरी आहे हे आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट करावे जर हे वक्तव्य अल्पसंख्यांक समाजाबद्दल असेल तर नाही ना हे जाहिर करावे अशी मागणी करत घुसखोरी या शब्दाबद्दल समाजातुन संताप व्यक्त होत असल्याचे सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा