युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

माकप शिष्टमंडळाकडून कुटूंबियांची भेट व सांत्वन

डॉ.संपदा मुंडे न्यायासाठी माकप करणार जिल्हाभर निदर्शने





माकप शिष्टमंडळाकडून कुटूंबियांची भेट व सांत्वन


बीड / प्रतिनिधी


सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ.संपदा मुंडे प्रकरणी तात्काळ एसआयटी अधिकारी नियुक्त करून तपासला गती देण्यात यावे, हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शासन करावे. संस्थापक अत्याचाराचे बळी जाण्याचे प्रमाणात वाढ झाली असून राज्यात कायद्या आणि सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडालेला आहे.डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येकाला कठोर शासन करावे या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जिल्ह्यात सर्वच तालुक्यात निदर्शने करण्यात येणार आहेत.रविवार दि 26 रोजी माकप चे राज्य कमिटी सदस्य कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ.बब्रुवान पोटभरे, कॉ.रोहिदास जाधव यांच्यासह जिल्हा कमिटीचे विविध पदाधिकारी यांनी मुंडे कुटूंबियांची भेट घेतली.


आत्महत्या केलेल्या महिला डॉ. संपदा मुंडे ह्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील रहिवासी असून त्यांनी माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करेल अशी वरिष्ठांकडे तक्रार पण केली होती परंतु वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले.राज्यात संस्थात्मक अत्याचाराचे बळी जाण्याचा प्रकार ह्या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी घोषणा केल्याप्रमाणे तात्काळ एसआयटी समिती नेमून अधिकारी नियुक्त करण्यात यावे. तपास वेगाने करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे.सर्व आरोपींवर कठोर शासन करावे या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीड जिल्हा कमिटी मंगळवार दि 28 रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती माकप जिल्हा पदाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या