परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
समाजसेवेचा ध्यास घेतलेला परळीतील युवा चेहरा – संदीप चौंडे
संदीप चौंडे: परळीतील सामाजिक कार्यातील उल्लेखनीय चेहरा: शून्यातून विश्व निर्माण करणारे युवा नेतृत्व
समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची उमेद, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची इच्छा आणि देशभक्तीची जाणीव मनात बाळगणारा एक तरुण कार्यकर्ता म्हणजे संदीप चौंडे. अल्पावधीतच त्यांनी आपल्या परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्तीमुळे लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कार्यातून प्रेरणा देणारे, तरुणाईचा आदर्श असलेले संदीप चौंडे हे नाव आज परळीच्या सामाजिक क्षेत्रात सर्व परिचित झाले आहे. सेवाभावी वृत्ती, कार्यतत्परता आणि समाजाप्रती असलेली निस्वार्थ भावना या गुणांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
डि.एम.एल.टी. या वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणामुळे त्यांना आरोग्यविषयक जाण मिळाली आणि याच जाणिवेवर आधारित अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन त्यांनी केले. सर्वसामान्य लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे त्यांचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.संदीप चौंडे यांनी समाजातील विविध घटकांसाठी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना काळात रुग्णसेवा केली.त्यांनी दिवस-रात्र जीव धोक्यात घालून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. त्या काळातील त्यांचे कार्य लोकांच्या मनात कायम कोरले गेले आहे. ऑक्सिजन,रक्तदान शिबिरे आयोजित करणे, अन्न व औषधांची सोय,शाळकरी मुलांना उपयोगी साहित्याचे वितरण, तसेच शेतकऱ्यांसाठी जनजागृती आणि मदतकार्य हे त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. स्वखर्चातून व सामाजिक जाणिवेतून त्यांनी राजकीय आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे.शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे, या विचारावर ठाम राहून संदीप चौंडे यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम हाती घेतला.दरवर्षी अनेक शाळांमध्ये जाऊन त्यांनी मुलांना पेन, वही, बॅग, गणवेश आणि क्रीडा साहित्य वाटप केले. यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली आणि अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी पक्षाच्या विचारधारेनुसार समाजाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली अनेक वर्षे ते विविध सेवा उपक्रम राबवतात. समाजासाठी कार्य करताना सामाजिक बांधिलकीतून सेवा उपक्रम हे साधन म्हणून वापरावे, ही त्यांची भूमिका सदैव स्पष्ट राहिली आहे. शेती ही केवळ व्यवसाय नाही, ती आपली संस्कृती आणि आत्मा आहे.शेती हा त्यांचा आत्मा आहे. शेतीतूनच मातीशी नाते घट्ट ठेवत ते युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी जागरूकता निर्माण करत आहेत.
संदीप चौंडे यांच्या कार्यशैलीत एक विशेष गोष्ट दिसते ती म्हणजे निस्वार्थ भावना आणि लोकांप्रती आदरभाव.ते नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करतात. बालक, युवक, महिला, शेतकरी, वृद्ध सर्वांशी आत्मीयतेने जोडले गेले आहेत. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक एकता वाढली असून तरुण पिढीला समाजसेवेची प्रेरणा मिळत आहे.
आज या सेवाभावी, कार्यतत्पर, विचारशील आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेल्या संदीप चौंडे यांचा वाढदिवस! अशा या समाजाभिमुख, कार्यतत्पर तरुण कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!त्यांचे आयुष्य आरोग्यदायी, यशस्वी आणि सेवाभावी कार्याने भरलेले राहो, हीच सदिच्छा.
पत्रकार महादेव गित्ते
परळी वैजनाथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा