परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
डॉ.संपदा मुंडे ही व्यवस्थेचा बळी -माकप
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ठिकठिकाणी निदर्शने
बीड / प्रतिनिधी
राज्यात स्त्रीच्या सुरक्षेतवर प्रश्न निर्माण झाला आहे. पर स्त्री माते समान असलेल्या महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या पुरोगामी राज्यात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली असून डॉ.पायल तडवी, वैष्णवी हगवणे आणि आताची डॉ.संपदा मुंडे ह्या सर्व घटना मनुवादी संस्कृतीला चालना देऊन पुन्हा अस्तित्वात आणण्याचे काम केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी करत असून या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मंगळवार दि 28 रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून हा प्रश्न केवळ एका जातीचा किंवा जिल्ह्याचा नसून शिक्षण आणि रोजगाराकरीता घर सोडून बाहेर पडलेल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न डॉ.संपदा मुंडे प्रकरणावर चव्हाट्यावर आलेला आहे. सत्तास्थानी ठाण मांडून बसलेली भाजपची मंडळी स्त्रियांना दुय्यम दर्जाने बघत असून स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याना संरक्षण देण्याचे काम राज्यातील कायदाचे रक्षण करणारेच करत आहेत. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना राजकीय पाठबळ देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू असून कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल आवाज उठवलेली पुणे येथील श्वेता पाटील आणि त्यांचा सहकारी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई मुळे सबंध महाराष्ट्राने पाहिले.
डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून हे एक सुनियोजितपणे करण्यात आलेली संस्थात्मक हत्या असून या प्रकरणी घोषित केल्या प्रमाणे बाहेर जिल्यातील एसआयटी अधिकारी नियुक्त करण्यात करून सखोल चौकशी करण्यात यावी. हे प्रकरण बाहेर जिल्ह्यात जलदगती न्यायालयात चालवून आरोपीवर कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणीला घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मंगळवार दि 28 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा