परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अभिवादन सभेत अनेकांनी व्यक्त केल्या आपल्या भावना

मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी यांना परळीकरांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन 




अभिवादन सभेत अनेकांनी व्यक्त केल्या आपल्या भावना 

परळी/ प्रतिनिधी-

  दैनिक मराठवाडा साथीचे संपादक सतीश शेठ बियाणी यांचे दिनांक 12 सप्टेंबर रोजी निधन झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात परळीकरांनी श्रद्धांजली अर्पण केली.तसेच  यावेळी उपस्थित मान्यवरासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्मृतीशेष सतीश शेठ बियाणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाच्या परळी शहराध्यक्ष उमाताई समशेट्टे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते एडवोकेट जीवनराव देशमुख, सुरज बियाणी,सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, दैनिक परळी प्रहार चे संपादक राजेश साबणे, ओमप्रकाश बियाणी, अनिल बियाणी आदी उपस्थित होते. 

   यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, दैनिक मराठवाडा साथीने परळी शहरातील अनेक आंदोलनाला पाठबळ दिले. तसेच अनेक कार्यकर्ते आणि नेते तसेच साहित्यिक घडविण्यात दैनिक मराठवाडा साथीचा सिंहाचा वाटा आहे. सतीश बियाणी हे हसतमुख व अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. त्यांचे परळीकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते. असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रा. पवन मुंडे, सौ उमाताई समशेट्टे, अडवोकेट जीवनराव देशमुख,  सुरज बियाणी, अनंत इंगळे, आदींनी सतीश शेठ बियाणी व दैनिक मराठवाडा साथी विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

    या कार्यक्रमास प्रसिद्ध व्यापारी विजय सामत, महेश बँकेचे चेअरमन ओमप्रकाश सारडा, प्रसिद्ध व्यापारी रतनशेठ कोठारी,सामाजिक कार्यकर्ते ह-भ-प रामेश्वर महाराज कोकाटे, धनंजय आढाव,अडवोकेट मनोज संकाये, ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे, संपादक ज्ञानोबा सुरवसे, संपादक बालकिशन सोनी, संपादक रामप्रसाद गरड, संपादक मोहन व्हावळे, संपादक बालाजी जगतकर, शिवाजीराव बनसोडे, प्रा. डॉक्टर राजकुमार यल्लावाड, प्राध्यापक कोकलगावे , वंदे मातरम चे दिलीप जोशी,पत्रकार प्रकाश चव्हाण, एडवोकेट अरुण पाठक, प्रा.रविंद्र जोशी, अश्विन मोगरकर,अरुण फुंडकर, सचिन स्वामी,चंद्रशेखर फुटके,विठ्ठलराव झिलमेवाड, मातोश्री ऑफसेटचे विठ्ठलराव साबळे, संतोष जुजगर, बालाजी ढगे, राजकुमार कदम, नरसिंग अनलदास, अंकुशराव जठार मामा, दत्तामामा लांडे, पत्रकार पप्पू कुलकर्णी, संपादक दशरथ रोडे, रवी पतंगे, आनंद हडबे ,दीपक वंजारखेडे, मुदस्सीर शेख, आनंद तुपसमुद्रे यांच्यासह संपादक, पत्रकार शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार धनंजय अरबुने यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे,पत्रकार भगवान साकसमुद्रे, पत्रकार अनिल गायकवाड, संपादक नितीन ढाकणे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सांगता सतीश शेठ बियाणी यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून आदरांजली वाहून करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!