परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण पळवले
परळी (प्रतिनिधी)
परळी शहरातील स्वाती नगर भागातील ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि.२२ ऑक्टोबर रोजी घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील स्वाती नगर भागातील रहिवासी प्रतिभा प्रमोद बावरे वय ५२ वर्षे या दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घराबाहेर पडल्या असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ५ ग्रॅम किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण ओरबडुन नेले.याप्रकरणी सदरील महिलेच्या फिर्यादीवरून दि.३० ऑक्टोबर रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि.राठोड हे करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा