इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन....

मागणी एक,मदत दुसरीच-किसान सभा आक्रमक



कर्जमाफीसह इतर मागण्याकरिता किसान सभेचे निदर्शने

बीड / प्रतिनिधी....

      निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे शेती विरोधी आयात-निर्यात धोरण आणि शेतमालाला न मिळालेल्या हमीभाव या तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजावर यंदाच्या खरिपात होत्याच नव्हतं करून ठेवलं आहे. नैतिक जवाबदारी असलेल्या सरकारने पोकळ आकड्यांचा खेळ करत मदतीची वलग्ना करत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असून शेतकऱ्यांची मागणी वेगळीच असताना मदत मात्र वेगळी केल्याने शेतकरी पुन्हा एकदा आपल्या मागण्याकरिता आज शुक्रवार दि 10 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती बीड किसान सभेने दिली आहे.

      यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले असून निवडणूक पूर्वी सत्तेत येण्यापूर्वी केलेली कर्ज माफीचे आश्वासन पूर्ण करण्याची ही रास्त वेळ असताना सत्ताधारी केवळ आकड्यांचा खेळ करत शेतकऱ्यांच्या हाती भोपळा देण्याचा प्रकार सुरू आहे.पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात यावेळीच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मदत करण्यात आली त्याच प्रमाणे राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना मदत करून आपले उत्तरदायित्व निभवावे. संपूर्ण कर्ज माफी करत एक्करी 50 हजार रु मदत, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना श्रमनुकसान भरपाई म्हणून 30 हजार रु प्रतिमाह, पीक विमा तात्काळ मंजूर करावा, खरवडून गेलेल्या शेतीचा संपूर्ण पंचनामा करत नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्याला घेत बीड जिल्हा किसान सभा, सिटू कामगार संघटना व शेत मजूर युनियन यांचे संयुक्तरित्या आज शुक्रवार दि 10 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा किसान सभेकडून देण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी आंदोलन

     शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्या, शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा, कर्जमाफी योजनेत पीक व शेती कर्जा बरोबरच बचत गट, सावकारी व मायक्रो फायनान्स कर्जाचाही समावेश करा, विद्यार्थ्यांची फी माफ करा, पीक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करा, शेती, जनावरे, घरे, गोठे यांचे झालेले नुकसान सरकारी खर्चाने रोजगार हमी योजनेतून कामे काढत भरून द्या यासारख्या १० मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!