परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
वैद्यनाथ इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा 100 % निकाल
निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
परळी: प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये वैद्यनाथ इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाने नर्सिंगच्या 1ते 6 सेमिस्टर च्या विधार्थीनी घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाच्या 100% निकालाची परंपरा कायम ठेवली
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या महाविद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आपला ठसा उमटविला आहे
महाविद्यालयात सुसज्ज लॅब, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक मशीन्स व विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणारा नियमिय अभ्यास व वैयक्तिक लक्ष हेच या यशा मागचं गमक आहे असे सांगत कॉलेज चे संस्थापक डॉक्टर सूर्यकांत मुंढे सर,प्रशासकीय अधिकारी शेख सर, प्रा. राम होळंबे, प्रा. अशोक हांगे सर यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा