परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज परळीत विजयादशमी उत्सव:शहरातून पथसंचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तालुका परळी वैजनाथ यांच्या वतीने आज रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने हा उत्सव विशेष उत्साहात साजरा केला जात आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण चिंतामणी फाउंडेशन स्कूल, तोतला मैदान, परळी वैजनाथ असे असून पथसंचलनाचा मार्ग चिंतामणी फाउंडेशन स्कूल — डॉ. हडबे हॉस्पिटल — सोनार लाईन — राणी लक्ष्मीबाई टॉवर — गणेशपार — नांदूरवेस — सरकारवाडा — आंबेवेस — तळ नगरेश्वर चौक मार्गे पुन्हा चिंतामणी फाउंडेशन स्कूल येथे समारोप होणार आहे.
सर्व हिंदू बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा