परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
आगामी नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी ताकदीने लढवणार
घटक पक्षातील पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक
परळी (प्रतिनिधी)
आगामी नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पुर्ण ताकदीने उतरण्याची रणनिती आखत असुन याबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकार्यांची रविवार दि.२६ ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली.या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
आगामी परळी नगरपालिका निवडणुकीची महाविकास आघाडीच्या वतीने रणनिती आखण्यात येत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार, कॉंग्रेस आय आदी पक्षांनी प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी म्हणुन ताकदीने लढण्यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष,गट,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,माकप आदी पक्ष संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांची शिवसेना कार्यालयात रविवारी बैठक पार पडली.परळी शहर हे पुरोगामी विचारसरणीचे शहर असुन नगरपालिका निवडणुकींचा इतिहास पहाता महाविकास आघाडीतील घटक पक्षांना साथ देणारी परळीतील जनता असुन परळी करांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी व शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी पुर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्यावर चर्चा करण्यात आली.या बैठकीस माकप जेष्ठ नेते कॉ.पी.एस.घाडगे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई,शिवसेनेचे तालुकाप्रमुख भोजराज पालिवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख, शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते यांच्यासह प्रकाशराव देशमुख,ॲड.शशिशेखर चौधरी,किरण सावजी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा