परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी : लक्ष्मीपूजन व व्यापारपेठेतील भेटीमुळे प्रभाग क्र. ९ ते १७ च्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या ऐवजी शुक्रवारी
धनंजय मुंडेंनी प्रभाग क्र. १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांच्या स्वतः घेतल्या मुलाखती
उद्या लक्ष्मीपूजन नंतर दरवर्षीप्रमाणे व्यापार पेठेत देणार शुभेच्छा भेटी
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) : परळी नगर परिषदेच्या प्रस्तावित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू असून उद्या (ता. २१) रोजी होणाऱ्या प्रभाग क्र. ९ ते १७ च्या मुलाखती लक्ष्मीपूजन व त्यानंतर नियमितपणे दिल्या जाणाऱ्या व्यापार पेठेतील शुभेच्छा भेटीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या असून या मुलाखती उद्या ऐवजी शुक्रवारी (ता. २४) रोजी सकाळी ११ ते पाच या वेळेत विशेष शासकीय विश्रामगृह परळी येथे होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी यांच्या वतीने देण्यात आली आहे.
आ. धनंजय मुंडे यांनी आज दिवसभर प्रभाग क्र. १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वतः घेतल्या.
दरम्यान सध्या दिवाळी सुरू असून उद्या लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. तसेच याच दिवशी दरवर्षी धनंजय मुंडे हे परळी वैद्यनाथ शहरातील व्यापार पेठेत भेटी देऊन सर्व व्यापारी बांधवांना शुभेच्छा देत असतात. त्या पार्शवभूमीवर सदरील प्रस्तावित मुलाखती या शुक्रवार पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दरम्यान उद्या (ता. २१) लक्ष्मीपूजन नंतर धनंजय मुंडे हे सायंकाळी पाच वाजल्यापासून परळी वैद्यनाथ शहरातील व्यापार पेठेत भेटी देण्यासाठी जाणार आहेत, असेही कळवण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा