भजन स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र निलंगा प्रथम
परळीच्या भजनी संघाला दोन बक्षीसे तर बीडच्या संघाला ताल संचलनासाठी तृतीय बक्षीस
परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पुरूष कामगारांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र निलंगाच्या संघाला प्रथम पारितोषिक मिळाले तर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण भवन धाराशिव, तृतीय क्रमांक कामगार कल्याण भवन लातूर या संघांनी पटकाविले.
या स्पर्धा कामगार कल्याण भवन धाराशिव येथे सोमवारी संपन्न झाल्या. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै. पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय रणदिवे, आगार व्यवस्थापक बालाजी भांगे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, गुणवंत कामगार कुलदीप सावंत, कामगार अधिकारी बनेश्वर सरडे, सुरज ऊंदरे आदि मान्यवरांच्या हस्ते झाले.
भजन स्पर्धेचा अंतिम निकाल
उत्कृष्ट वादक:
प्रथम क्रमांक
हनुमंत जगदाळे,कळब
द्वितीय क्रमांक
उमेश पतंगे उदगीर.
तृतीय क्रमांक
स्वप्निल शेटे अंबाजोगाई.
उत्कृष्ट गायक:
प्रथम क्रमांक
घोडके अविनाश परळी.
द्वितीय क्रमांक
महादेव पवार. लातूर.
तृतीय क्रमांक
न्यानोबा व्यवहारे अंबाजोगाई.
उत्कृष्ट पेटीवादक:
प्रथम क्रमांक
ऋतुराज पुरी निलंगा.
द्वितीय क्रमांक
श्रीमंत मुंडे परळी
तृतीय क्रमांक
तुकाराम कुंभार धाराशिव.
उत्कृष्ट तालसंच:
प्रथम क्रमांक
कामगार कल्याण केंद्र निलंगा.
द्वितीय क्रमांक
कामगार कल्याण भवन धाराशिव.
तृतीय क्रमांक
कामगार कल्याण केंद्र बीड.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्र संचालक संगमेश्वर जिरगे यांनी केले तर आभार केंद्र संचालक आरेफ शेख यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा