परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
स्व.डॉ.संपदा मुंडे यांना महाविकास आघाडीच्या वतीने श्रध्दांजली, दोषींवर कठोर कारवाईची मागणी
परळी(प्रतिनिधी)
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.संपदा मुंडे या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक असुन महाविकास आघाडीच्या वतीने संपदा मुंडे यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
पोलिस प्रशासन व एका खासथाराच्या छळास कंटाळुन डॉ.संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फलटन येथे घडली.महाविकास आघाडीच्या वतीने रविवार दि.२६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे मेणबत्त्या लावुन श्रद्धांजली अर्पण केली.ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का लावणारी असुन प्रशासनाने घेतलेला बळी आहे.या प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करण्याची आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून, महिला डॉक्टरांना न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ आणि कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी माकप जेष्ठ नेते कॉ.पी.एस.घाडगे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई,शिवसेनेचे तालुकाप्रमुख भोजराज पालिवाल,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते उत्तम माने,शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख,शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते यांच्यासह नारायण सातपुते, प्रकाशराव देशमुख,सुभाषराव देशमुख,सतिश देशमुख,ॲड.शशिशेखर चौधरी,किरण सावजी,फरकुंद अली बेग आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा