बी सी ए चा विद्यार्थी अभिषेक शिवराज नागरगोजे याची उत्तुंग भरारी

विद्यापीठस्तरीय अविष्कार  स्पर्धेत  वैद्यनाथ कॉलेजचे यश



बी सी ए चा  विद्यार्थी अभिषेक शिवराज  नागरगोजे याची  उत्तुंग भरारी 

 परळी (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित विद्यापीठस्तरीय अविष्कार २०२५ चे आयोजन दि.३ व ४ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले होते .या स्पर्धेत बीड , धाराशिव , जालना , आणि छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे एकूण ६२१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता .सदरील स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजमधील बीसीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी अभिषेक शिवराज नागरगोजे याने    बीड जिल्ह्याचे नेतृत्व करत तृतीय क्रमांकाचे पारितोषक संपादन केले.  या विद्यार्थ्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि खरेदी सहाय्यक या विषयावर आपले स्वतः तयार केलेले मॉडेल  विद्यापीठ नियुक्त अविष्कार समिती आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केले. या स्पर्धेतील यशामुळे त्याची राज्यस्तरीय अविष्कार २०२५ करिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संघात निवड झालेली आहे. या यशाबद्दल जवाहर शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चि.अभिषेक नागरगोजे यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी अभिषेक नागरगोजे यास मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देणे व त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडविणे ही एक काळाची गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे असे मत या प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगाचे औचित्य साधून महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. जे.व्ही.जगतकर,  बीसीए विभाग प्रमुख डॉ व्हि.व्हि. मुंडे, डॉ . टी.ए. गित्ते , डॉ किरवले एस. वि. , प्रा. मनोज वाघमारे    आणि  सर्व बीसीए स्टाफ  यांच्या उपस्थितीत प्राचार्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदरील उपक्रमात डॉ एम.जी लांडगे यांनी संघप्रमुख म्हणून कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एम.जी. लांडगे यांनी केले तर आभार डॉ. व्ही. व्ही. मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !