स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई...
गुटख्याची अवैध वाहतूक उघडकीस; 6.75 लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – दिनांक 08 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा, बीड पथकाने पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीच्या आधारे केलेल्या कारवाईत 6.75 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे.
ही कारवाई अंबाजोगाई शहरातील गीता रोड येथे करण्यात आली. एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई करत छापा टाकला. त्या वेळी आरोपीच्या वाहनातून वेगवेगळ्या कंपनींचा गुटखा व पान मसाला असा एकूण ₹6,75,400/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी गोविंद मधुकर शेप, रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई विरुद्ध गुन्हा क्र. 0496/25, भादंवि कलम 123, 274, 275, 223 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, बीड पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रामचंद्र केकान व पो.कॉ. गोविंद भताने यांनी केली असुन पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा