परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
◾चार कलावंत आणि चार भिन्न कला माध्यम
परळी तालुक्यातील साळुंकवाडी चे तुकाराम कर्वे आणि दौंडवाडीचे हरिराम फड यांच्या कलाकृतीपरळी /प्रतिनिधी- तालुक्यातील दोन कलावंत भूमिपुत्र आणि नाशिक व मुंबईचे दोन अशा चार मित्रांचे एकत्रित कला प्रदर्शन नेहरू सेंटर वरळी येथे सुरू झाले आहे. प्रदर्शनात तुकाराम कर्वे मूळचे साळुंकवाडी तालुका परळी हरिराम फड दौंडवाडी तालुका परळी, संजय पाटील, मुंबई आणि सुनील महामुनी, नाशिक अशा चार मित्रांच्या कलेचं प्रदर्शन चोखंदळ कला रसिकांसाठी हे १५ ऑक्टोबर पासून पहावयास खुले झाले आहे.प्रदर्शनाचं उदघाटन १४ ऑक्टोबर रोजी जेजे स्कूल ऑफ आर्ट चे डॉ. प्रा. गणेश तरतरे यांच्या हस्ते झाले.तर डॉ. गजानन शेपाळ यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार संजय पेठे व सैफ्रॉन आर्ट गैलरीच्या अलका सामंत यांनी फित कापून प्रदर्शनाचे उदघाटन केले. डिनोडिया फोटो चे जगदीश अग्रवाल व दौंडवाडी चे माजी उपसरपंच जग्गनाथ दौण्ड, आर्ट गैलरी चे संचालक संतोष पेडणेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिल्पकला, डिजिटल मिक्स मीडिया. लँड स्कॅप व डिजिटल पेन्टिंग अनुक्रमे हरिराम फड, तुकाराम कर्वे, सुनील महामुनी व संजय पाटील ह्या चार कलाकार मित्रांचे प्रदर्शन रसिकाकरीता २० ऑक्टोबर पर्यंत खुले राहील. कला रसिकानी जरूर प्रदर्शनाला भेट देऊन कलेचा आस्वाद घ्यावा.
'कॉनफ्लूयन्स' - संगम चार कलाकार मित्रांचं कला प्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटर कला दालनात सुरु आहे. रसिकांसाठी हे १५ तारखेपासून २० तारखेपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पहावयास उपलब्ध आहे.
◾ चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिली भेट
नेहरू सेंटर, वरळी येथे चालू असलेल्या या प्रदर्शनास मध्ये मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भेट देऊन हरिराम फड शिल्पकार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गणेश शिल्पांचे कौतुक केले तर इतर डिजिटल मीडिया आणि निसर्गचित्रनचं कलात्मक काम करणाऱ्या कलावंतांना शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा