परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

दहा हजाराचे पाच लाख देण्यासाठी सावकाराचा तगादा ....

परळीत खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतमजूराची आत्महत्या





परळी वैजनाथ  - आर्थिक अडचणींना कंटाळून आणि सावकाराच्या धमक्यांमुळे एका शेतमजूराने विष घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना परळीत घडली आहे. मयत शेतमजूराचे नाव देविदास एकनाथराव शिंदे, वय 55 वर्षे, रा. कृष्णा नगर, परळी असे आहे.केवळ दहा हजार रुपये उधार घेतले होते पण खाजगी सावकार त्यावर पाच लाख रुपये फेड करण्यासाठी तगादा लावत होता. एवढंच नव्हे, तर पैसे नाही दिले तर शेती नावावर करून घेईन अशी थेट धमकी देत होता.या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दहा हजाराचे पाच लाख देण्यासाठी सावकाराचा तगादा 

 खाजगी सावकाराकडुन हात उसणे घेतलेले दहा हजार रुपये परत केले तरी त्या दहा हजार रुपयांचे व्याज पाच लाख रुपये झाले असल्याचे सांगत त्यासाठी तुझी जमीन आमच्या नावावर कर म्हणत मारहाण करुन दिलेल्या त्रासाला कंटाळुन ५५ वर्षीय शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना दि.४ ऑक्टोबर रोजी घडली.याप्रकरणी खाजगी सावकारकी करणार्या दोघांविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी एकास अटक केली आहे 

 परळी शहरातील कृष्णा नगर भागातील रहिवासी देविदास शिंदे यांचे लोणी ता.परळी येथे अडीच एकर जमीन असुन ते आपल्या कुटुंबासह परळीतील कृष्णानगर भागात रहात होते.गतवर्षी त्यांनी भारत विक्रम गायकवाड व अशोक विक्रम गायकवाड यांच्याकडुन दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते.त्याचे सर्व मुद्दल मुलगा कृष्णा याच्या फोन पे वरुन परत केलेले असताना गायकवाड यांनी आपण दिलेल्या दहा हजार रुपयांचे व्याज बाकी असुन ते पाच लाख रुपये झाले आहे.ते पैसे देण्यासाठी शिंदे यांना तुमची जमीन आमच्या नावे करा असा तगादा लावत त्यांचे कागदपत्रे घेवुन मारहाण केली.देविदास शिंदे हे परळी शहरातील अनंतपुरे यांच्याकडे सालगडी म्हणुन काम करत असल्याने एवढे पैसे देण्याची परिस्थिती नसल्याचे सांगुनही सतत त्रास देणे सुरु केले.या त्रासाला कंटाळुन देविदास शिंदे यांनी अनंतपुरे यांच्या शेतात विष प्राशन केले.त्यांना परळी उपजिल्हा व त्यानंतर अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले परंतु दि.४ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.याबाबत मयत देविदास शिंदे यांचा मुलगा कृष्णा शिंदे याच्या फिर्यादीवरून भारत विक्रम गायकवाड व अशोक विक्रम गायकवाड या दोघांविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी अशोक गायकवाड यास अटक करत न्यायालयापुढे हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर भारत गायकवाड हा अद्याप फरार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!