संभाजीनगर एनसीसी विभाग प्रमुखाची वैद्यनाथ काॅलेजला तपासणी भेट
आज परळी शहरातील वैद्यनाथ काॅलेजला. छत्रपती संभाजीनगर एनसीसी 51 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. सुनील रेड्डी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.150/60मुलांची निवड प्रशासकीय सेवेत दाखल झाले हे पाहून समाधान व्यक्त केले. भविष्य कुठल्या मार्गाने सोपे होईल याचे मार्गदर्शन केले.
एनसीसी विभाग प्रमुख, कर्नल रेड्डी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगतकर सर यांची भेट घेऊन चर्चा केली. कौतुक केले.आणि या प्रसंगी भाषणात विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य जगततकर सर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रस्तावना कॅप्टन चव्हाण सर यांनी केली सूत्रसंचालन सय्यद शाकेर यांनी केले, तर आभार टी.एन गंगणेसर यांनी मानले.
कार्यक्रमाला काॅलेजचे प्राध्यापक, एनसीसी अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा