परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
निवृत्त शिक्षक भाऊसाहेब देशमुख यांचे निधन
आज परळीत अंत्यसंस्कार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नामांकित असलेल्या वैद्यनाथ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब रुस्तुमराव देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्ष होते. उद्या मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कै. भाऊसाहेब देशमुख यांनी वैद्यनाथ विद्यालयात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट शेती केली. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे व लहान थोराशी नेहमी हसतमुख चेहऱ्याने बोलत होते. ते अजातशत्रू होते. सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकाचे चाहते होते. त्यांचा मोठा मुलगा धीरज उर्फ रुस्तुम विद्यादान क्षेत्रातच कार्यरत आहे. भाऊसाहेब देशमुख आजारी असल्याने लातूर येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची आज सोमवारी (दि. 21 ऑक्टोबर) रोजी रात्री प्राणज्योत मालवली.
कै. भाऊसाहेब देशमुख यांच्या पश्चात चार मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आज परळीत अंत्यसंस्कार
कै. भाऊसाहेब देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता परळी येथील देशमुख स्मशानात भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा