13ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा तालुका सुविधा केंद्रावर मोर्चा - प्रा. बी. जी. खाडे
परळी वैजनाथ- प्रतिनिधी....
बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने परळी तालुका सुविधा केंद्रावर बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी१५००० (पंधरा हजार) बोनस द्या या प्रमुख मागणीसाठी 13 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगारांना पाच हजार रु. बोनस जाहीर करूनही दिला नव्हता. सन 2024-25 वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळावी, लाभांच्या रकमा तात्काळ बांधकाम कामगारांना मिळव्यात, नोटरी स्वयं घोषणापत्राच्या आधारावर बांधकाम कामगारांची नोंदणी करावी, बांधकाम कामगार ज्या ठिकाणी काम करतो तेथील प्रमाणपत्राच्या आधारे नोंदणी व्हावी- बांधकाम कामगारांना भांडे सेट ताबडतोब वाटप करावेत , मोबाईल क्रमांक बदल, आधार कार्डात बदल, मुलांच्या नावात बदल इत्यादी सुविधा केंद्रावरच व्हावीत आदी मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केलै आहे. मोर्चा 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालया पासून निघून मोंढा, बसस्टँड शिवाजी चौक मार्गे जलालपूर भागातील सुविधा केंद्रावर निघेल.बांधकाम कामगारांनी मोठया संख्येने सामील व्हावे असे आवाहान संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी. खाडे, प्रकाश वाघमारे शेख जावेद,जालिंदर गिरी, नवीद मोजेन, बाबासाहेब रोडे, शेख फेरोज आदींनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा