उद्योग, शिक्षण, संस्कृती, समाजसेवा व रोजगारचा मजबूत पाया: प्रभाग 07 ला मिळाला नगरसेवकपदाचा  उद्योगी चेहरा !




महायुतीकडून सचिन सारडांची सक्षम व अश्वासक उमेदवारी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी  प्रभाग क्रमांक 07 मधून महायुतीकडून सचिन सारडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी आल्यामुळे प्रभाग क्रमांक 07 साठी उद्योग, शिक्षण, संस्कृती, समाजसेवा व रोजगारचा मजबूत पाया असलेला उमेदवार मिळाला आहे.

          परळी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 07 मधून महायुतीकडून उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सचिन सारडा यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नियोजनात व व्यवस्थापनात परफेक्ट, कार्यतत्पर आणि सामंजस्यपूर्ण नेतृत्व ही त्यांची ओळख असून, ते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण काम करीत आहेत. जनसेवेच्या कामात व लोकप्रतिनिधी म्हणून सचिन सारडांसारख्या उद्योगी युवकाला संधी देण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले आहे.


सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सचिन सारडा यांनी माहेश्वरी युवा संघटन च्या माध्यमातून युवकांचे मजबूत संघटन उभे केलेले आहे.अठरापगड जाती धर्मातील त्यांचा स्नेह व संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकत क्युरियस किड्स ही अभिनव शाळा परळीत अत्यंत यशस्वीपणे चालवली आहे तसेच विद्यानिकेतन स्कूल सुरू केले आहे.शहराच्या शिक्षण क्षेत्रात वैभवाची भर घालण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले आहे.शहरात विविध संस्थांची उभारणी करून त्यांनी शहरात सामाजिक विकासाला हातभार लावला आहे.


व्यवसाय क्षेत्रात त्यांचा ‘युनिक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ परळी सहित इतर ठिकाणी कार्यरत असून फेविकॉल उत्पादन, जिनिंग-प्रेसिंग आदी उद्योगातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उद्योजकता, रोजगारनिर्मिती आणि युवकांना उद्योग व्यवसायासाठी भक्कम आधार देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. निराधारांना मदत, समाजातील गरजवंतांना आधार आणि सर्वसमावेशक विकासाची भूमिका यामुळे सचिन सारडा यांना “एक सुसंस्कृत, उद्योगी चेहरा” अशी ओळख मिळालेली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 07 मध्ये एक सुसंस्कृत, सक्षम व उद्योगी चेहरा महायुतीकडून देण्यात आल्याने या प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या उमेदवारीला या प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन सचिन सारडांना फिक्स सभागृहात पाठवायचे हा निर्धार नागरिकांनी केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार