परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
माकप तालुक्यातील जिप चे तीन गट व त्याअंतर्गतच्या सहा गणात उमेदवार देणार- कॉ गंगाधर पोटभरे
परळी वैजनाथ ता 12 प्रतिनिधी
परळी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व त्याअंतर्गत येणारे पंचायत समितीच्या सहा गणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उमेदवार उभा करणार असल्याची माहिती पक्षाचे तालुका सचिव कॉ गंगाधर पोटभरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बुधवारी दि 12 रोजी सिरसाळा येथे तालुका कमीटीची बैठक झाली. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या संभाव्य निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. माकप कायम भाजप व त्यांच्या युतीच्या विरोधातील पुरोगामी विचाराच्या पक्षां सोबत निवडणुक आघाडी करीत आला आहे. या निवडणुकीत माकप ची तसीच भुमिका राहणार आहे. मागील काही वर्षात तालुक्यात माकप च्या वतीने शेतकऱ्यांरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर लढे आंदोलने केलेले आहेत. 2018 साली पिक विम्याच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनामुळे हजारों शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये मिळाले. तसेच तालुक्यातील विज, घरकुल, गायरान, रेशन यासह विविध प्रश्नांवर माकप सतत जनतेला सोबत घेऊन आंदोलन करीत आहे. शेतकरी वर्गात माकप विषयी सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक माकप लढविणार आहे. जिल्हा परिषदेचे मोहा, सिरसाळा व पिंपरी गटातुन उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या मोहा, नागापुर, सिरसाळा, पोहनेर, पिंपरी व पांगरी गणातुन उमेदवार उभे करण्यात येणार आहे. याबाबत तालुका कमेटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला माकपचे जिल्हा सचिव कॉ अजय बुरांडे, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ विशाल देशमुख, कॉ भगवान बडे, कॉ पप्पु देशमुख, कॉ राधाकिशन जाधव, कॉ बाबा शेरकर, कॉ प्रकाश उजगरे, कॉ आबा कांबळे, कॉ मदन वाघमारे, कॉ बळीराम देशमुख, कॉ लांडे यांची उपस्थितीत होती. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व त्याअंतर्गत येणारे सहा गण माकपनी लढविण्याचा निर्णय घेतल्याचा माकपचे तालुका सचिव कॉ गंगाधर पोटभरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
* बहुतांश राजकीय पक्ष सर्वच निवडणुकांमध्ये पैशाचा अमाप वापर, जातीय व धार्मिक अस्मिता वाढवतात. जनतेच्या प्रश्नां ऐवजी भावनिक मुद्यावर निवडणुक लढवितात. परंतु अशाही परिस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी, ऊसतोड मजुर, महिला, शोषित व वंचितांचे जिव्हाळ्याचे प्रश्न राजकीय पटलावर आणण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा