परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील 250 आशांचा सहभाग

 महाराष्ट्र आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU च्या अधिवेशनाची रॅली व सभेने सुरुवात


दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील 250 आशांचा सहभाग 

परळी वै. दि. 8 प्रतिनिधी....

        आशांना शासकिय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मिळाले पाहिजेत यासाठी आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU सतत लढे आंदोलन करीत आहे. मागणी मान्य होई पर्यंत लढा चालु ठेवण्याचा निर्धार CITU चे राज्य महासचिव कॉ एच एम शेख यांनी केला आहे. शनिवारी दि 8 रोजी परळी येथील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.

      महाराष्ट्र आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU चे 4 अधिवेशन परळी येथील प्रवचन सभामंडपात झाली. शनिवारी दि 8 रोजी सकाळी दहा वाजता प्रवचन सभामंडप येथुन आशा स्वंसेवीका ची रॅली काढण्यात आली. रॅली मधील आशांच्या हातात लालबावटयाचा झेंडा व मागण्यांच्या गगणभेदी घोषणानी परिसर दणाणून गेला होता. रॅली चा समारोप मोंढा मैदानावरील जाहीर सभेने झाला. यावेळी बोलताना कॉ एच एम शेख यांनी आरोग्य विभागातील महत्वाचा दुवा म्हणुन आशा स्वंसेवीका काम करीत आहेत. कोरोना सारख्या महामारीत प्रत्येक घरोघरी जाण्याचे काम आशांनी केले होते. त्यांना सेवेत कायम करुण शासकिय लाभ मिळाले पाहिजेत. यासह विविध प्रलंबित प्रश्ने सरकारनी सोडवावीत. आशा वर्कर्स यूनियनच्या राज्याध्यक्ष कॉ आनंदी आवघडे, सरचिटणीस कॉ पुष्पा पाटील, सिटु चे स्वगताध्यक्ष सय्यद हनीफ करीम उर्फ बहादुर भाई यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर माकप चे जेष्ठ नेते कॉ पी एस घाडगे, कॉ अशोक थोरात, कॉ सुवर्णा रेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सिटु चे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे यांनी केले. सुत्रसंचलन बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे जिल्हा सचिव कॉ किरण सावजी यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हाध्यक्ष कॉ शिवाजी कुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा लांडगे, हेमा काळे, अनिता गिराम, छाया रणदिवे, सारिका मुंडे, अनिता चाटे, भाग्यश्री थावरे, उमा वाघमारे, भारती राख, सुवर्णमाला मुंडे, जालिंदर गिरी, शेख जावेद, प्रकाश वाघमारे, बाबासाहेब रोडे, शुभम काकडे आदींनी परिश्रम घेतले.

* वैजनाथ मंदिर परिसरातील प्रवचन सभामंडप येथुन रॅलीला सुरुवात 

* वैजनाथ मंदिर, सेवालाल महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे मोंढा मैदानावर रॅली चे रुपांतर सभेत झाले.

* रॅलीत आशांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

* सर्व आशांनी लाल साडी परिधान केल्याने वेगळेपण दिसत होते.

* भव्य रॅली व गगणभेदी घोषणेनी परिसर दणाणून गेला होता.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!