परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक : आज एकूण 27 नामनिर्देशनपत्र आले- नगराध्यक्ष पदाकरिता 3 तर सदस्य पदाकरिता 24 अर्ज दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज एकूण 27 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.नगराध्यक्ष पदाकरिता 3 तर सदस्य पदाकरिता 24 अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदाकरिता 3 अर्ज दाखल झाले असुन यामध्ये शेख कौसरबेगम अश्फाक, महंमद फरजाना सुलेमान, शेख नूरजहाँ बेगम मैनोद्दीन यांचा समावेश आहे.
नगरपरिषद सदस्य पदाकरिता 24 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.प्रभाग क्रमांक 2- तीन नामनिर्देशनपत्र दाखल सर्वसाधारण प्रवर्गातून कुरेशी वहाब हमीद , शेख जुबेर लालामिया (यांचे कडून 2 नामनिर्देशनपत्र) ,
प्रभाग क्रमांक 3- पाच नामनिर्देशनपत्र दाखल शेख खैरुनिसा बेगम युसूफ, तांबोळी अजीम इसाक ,शेख सोहेल मुख्तार,शेख हुसेनाबी अमीन,शेख आयेशा मोसीन
प्रभाग क्रमांक 6- दोन नामनिर्देशनपत्र दाखल. सर्वसाधारण प्रवर्गातून आंधळे गोपाळकृष्ण रावसाहेब आणि पद्मराज बलभीम गुट्टे
प्रभाग क्रमांक 7-सर्वसाधारण प्रवर्गातून देशमुख मंगेश शिवाजीराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक 9- चार नामनिर्देशनपत्र दाखल :सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेख नूरजहाबेगम मैनोद्दीन,सय्यद असिया बेगम युसूफ, शेख रेहाना बाबुमिया, नसरीन बेगम अर्शद खान
प्रभाग क्रमांक 10 - दोन नामनिर्देशन पत्र दाखल: अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सुरेखाबाई पंडित झिंजुर्डे (यांचे कडून 2 नामनिर्देशनपत्र दाखल ),
प्रभाग क्रमांक 15- एक नामनिर्देशन पत्र दाखल: इतर मागास प्रवर्गातून मुजावर शाहेद बाबामिया यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक 16- तीन नामनिर्देशन पत्र दाखल: सर्वसाधारण प्रवर्गातून शेख अश्फाक सज्जाद, बागवाले नितीन माणिक, पठाण इमरोज फिरोज
प्रभाग क्रमांक 17-तीन नामनिर्देशन पत्र दाखल :सर्वसाधारण महिला प्रवर्गातून- क्षीरसागर सुवर्णमाला वैजनाथराव,सर्वसाधारण प्रवर्गातून पठाण रसूल खान अफसर खान आणि शेख निसार नसीरयांचा उमेदवारी अर्ज दाखल
------------------------------------------------
आज दिनांक 14 .11.2025 पर्यंत एकूण 38 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले आहेत. चार नामनिर्देशन पत्र अध्यक्ष पदाकरिता तर नगरपरिषद सदस्य पदाकरिता 34 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले आहे.
------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा