इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

करम येथे घडली घटना; १ लाख 59 हजार रु.सोयाबीन चोरी

शेतकऱ्याचे घामाचे पीक, चोरट्यांच्या हाती;३७ क्विंटल सोयाबीनवर रातोरात डल्ला!




करम येथे घडली घटना; १ लाख 59 हजार रु.सोयाबीन चोरी

परळी/सोनपेठ, (प्रतिनिधी):- शेतकऱ्याच्या घामाच्या पाण्याने पिकवलेल्या सोयाबीनवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल ३७ क्विंटल सोयाबीन लंपास केल्याची धक्कादायक घटना करम शिवारात उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलीस करीत आहेत.

     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आत्माराम धुमाळ (वय ३१, रा. शंकर पार्वतीनगर, परळी वैजिनाथ, जि. बीड) हे शेतकरी आपल्या करम येथील गट क्र. ७२ क आणि १०१ ब मधील दोन हेक्टर शेतजमिनीत शेती व्यवसाय करतात. त्यांनी यावर्षी सोयाबीनचे पीक घेतले होते. दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी पिकाची मळणी करून, त्यातील ११५ पोती सोयाबीन आपल्या चुलते शरद दगडोबा धुमाळ यांच्या आखाड्यावर ३१ ऑक्टोबर रोजी साठवून ठेवली होती. परंतु, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी त्यांच्या चुलत्यांच्या गडीने पाहणी केली असता अनेक पोती गायब असल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती धुमाळ कुटुंबीयांना दिली. शुभम धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ११५ पैकी ६२ पोती, प्रत्येकी अंदाजे ६० किलो वजनाची, चोरीस गेलेली आढळली. चोरीस गेलेल्या सोयाबीनच्या पोत्यांवर Jarandeshwar Sugar Mills Pvt. Ltd. – WHITE CRYSTAL SUGAR DOUBLE SULPHITATION" अशी छपाई होती. एकूण ३७ क्विंटल वजनाचे सोयाबीन, ज्याची बाजारभावानुसार किंमत प्रत्येकी क्विंटल ४३०० रुपये, असा एकूण १,५९,१०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना दि. ८ नोव्हेंबरच्या रात्री ११.०० वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबरच्या सकाळी ७.०० वाजेपर्यंत घडल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलिस ठाण्यात शुभम धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व संतापाचे वातावरण आहे. अन्नदात्यांच्या कष्टाचे पीक अशा प्रकारे चोरीस जाणे म्हणजे ग्रामीण भागातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करते, अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

     दरम्यान, पोलीस निरीक्षक अशोक रावसाहेब गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजसह संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या