परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
प्रभाग 7 च्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय
सौ.संध्या देशमुख, सौ. राजामतीबाई राऊत, वैजनाथ धंपलवार यांनी साधला संवाद
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ज्यांना भरभरून मतदान दिले त्यांनी प्रभागाच्या विकासाकडे दूर्लक्ष केले. प्रभागाचा काहीच विकास केला नाही. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित असुन मतदारांनी भरभरून आशिर्वाद द्यावेत असे आवाहन आज प्रचार फेरीत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्याताई देशमुख, प्रभाग 7 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. राजामतीबाई राऊत, वैजनाथ धंपलवार यांनी मतदारांशी संवाद साधला. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्याताई देशमुख, प्रभाग 7 मधील उमेदवार सौ. राजामतीबाई राऊत, वैजनाथ धंपलवार यांनी याज प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. मतदारांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. प्रभागात नाली नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, घाणीचे साम्राज्य आहे अशा अनेक तक्रारी केल्या. नागरिकांची सर्व गार्हाणी ऐकून घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या देशमुख यांनी "आम्हाला तुम्ही संधी द्या, आम्ही तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही" असा शब्द दिला.
प्रभाग क्रमांक 7 मधील प्रभागाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही निवडणूक लढवीत असून विकासाचे सर्व प्रश्न मागे लावले जातील. असा शब्द नगरसेवक पदाचे उमेदवार वैजनाथ धमपलवार व सौ. राजामतीबाई राऊत यांनी मतदारांना दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या देशमुख व नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. राजामतीबाई राऊत, वैजनाथ धंपलवार, युवक नेते श्रीनिवास राऊत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रभागांमध्ये प्रचार फेरी काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि तुतारी या चिन्हावरच मतदान करण्याचे आवाहन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा