युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

“पप्पू पास हो गया, पप्पू मेरीट आ गया!”

 परळी संचार” दिवाळी अंकाचे आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून तोंडभरून कौतुक



संस्कृती, अध्यात्म आणि परळीचे सामाजिक प्रतिबिंब उजळवणारा अंक


परळी (प्रतिनिधी) : परळी शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या ‘परळी संचार’ या सर्वांगसुंदर दिवाळी अंकाचे आमदार धनंजय मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केले. “हा अंक केवळ दिवाळी अंक नसून परळीच्या सांस्कृतिक समृद्धीचा दस्तऐवज आहे,” अशा शब्दांत त्यांनी संपादक अनंत कुलकर्णी यांच्या प्रयत्नांचे मनापासून अभिनंदन केले.


सुंदर मुखपृष्ठ, आकर्षक मांडणी आणि विषयानुरूप अभ्यासपूर्ण लेख यामुळे ‘परळी संचार’ दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे. संस्कृत पंडिता डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या कर्तृत्वावर आधारित लेखाने या अंकाची शैक्षणिक उंची वाढवली असल्याचे मुंडे यांनी नमूद केले. “पप्पू पास हो गया, पप्पू मेरीट आ गया!” या विनोदी परंतु कौतुकपूर्ण शैलीत त्यांनी संपादकांच्या धडपडीचा गौरव केला.


अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे येत समाजातील सर्व घटकांशी सुसंवाद ठेवून अनंत कुलकर्णी यांनी हा अंक साकारला आहे. अनेक सहकाऱ्यांच्या सहयोगातून साकारलेल्या या अंकाने परळीच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि राजकीय परंपरेचे जिवंत चित्र उभे केले आहे.


आमदार मुंडे म्हणाले, “‘परळी संचार’ हा केवळ एक मासिक नाही, तर परळी शहराच्या विचारप्रवाहाचे आरसे आहे. अशा प्रयत्नांमुळे स्थानिक लेखन आणि सांस्कृतिक चळवळींना नवसंजीवनी मिळते.”


यावेळी उपस्थित मान्यवरांनीही संपादक अनंत कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच दर्जेदार अंकांच्या माध्यमातून परळीचे वैभव उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान  या परळी संचार दीपावली अंकाची सजावट  व आकर्षित मांडणी करणारे  दता शिवगण तसेच  उत्कृष्ट प्रिंटींग साठी सहकार्य करणारे विठ्ठल साबळे यांचेही संपादक अनंत कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या