परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 22 नोव्हेंबर रोजी परळीत
परळी प्रतिनिधी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे 22 नोव्हेंबर रोजी परळी शहरात येत असून त्यांच्या हस्ते परळी नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांची निवडणूक लढविण्यात येत आहे. या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शनिवार,दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. शहरातील मोंढा मार्केट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल.
माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य अमित भुईगळ ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेशभाऊ कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी परळी शहरातील सुजाण मतदार बंधू-भगिनी आणि नागरिकांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी या प्रचार शुभारंभाच्या होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा