परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
समाजवादी पक्षाच्या परळी शहर अध्यक्षपदी काजी सिराजोद्दीन यांची नियुक्ती
परळी (प्रतिनिधी) : समाजवादी पक्ष बीड जिल्हा शाखेच्या वतीने परळी तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. काजी सिराजोद्दीन यांची परळी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष मोहम्मद सुफयान इमाम खान यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
पक्षाच्या कार्यात निष्ठा आणि संघटनबांधणीचे कार्य करून समाजवादी विचारधारेचा प्रसार करावा. पक्षाच्या धोरणांचा प्रचार करून लोकांमध्ये जनजागृती करावी असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. काजी सिराजोद्दीन यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. समाजवादी पक्षाचे विचार घराघरात पोहोचवू असे सांगितले.
अंया प्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. परळीतील या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा