परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
भाजपचे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा व प्रेरणेचे केंद्र बनेल - ना. पंकजा मुंडे
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात लोकार्पण
छत्रपती संभाजी नगर
।दिनांक १६।
भारतीय जनता पक्षाचा पाया हा संघर्षातूनच उभा आहे. अटलजींनी त्या काळामध्ये "ना हार मे, ना जीत मे, ना भयभीत किंचित में" असे म्हणत ही संघर्षाची बीजं पेरली. त्या संघर्षमय वाटचालीला नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यश मिळवून देत सुवर्ण सुवर्णकाळ आणला आहे असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजा मुंडे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. त्यावेळी ना पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघर्षातून सुवर्णकाळाकडे झालेल्या वाटचालीची थोडक्यात प्रभावी मांडणी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले की,भारतीय जनता पक्षाने त्या दशकांमध्ये पक्ष वाढीसाठी मोठा संघर्ष केला. मात्र आज तोच पक्ष संपूर्ण भारतात यशस्वी झालेला आहे. त्या दशकातील पक्ष वाढीसाठी खस्ता खाल्लेल्या सर्व नेत्यांचे हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे करून दाखवले आहे. बिहारमध्येही आपल्याला प्रचंड यश मिळाले आहे. आता कोणतेच राज्य असे राहणार नाही जिथे भाजपाची पूर्ण सत्ता नसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही भाजपाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वप्न होते की तिसऱ्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी ते पूर्ण केले आहे. आज प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यालय उभी राहत आहेत. ही कार्यालय केवळ कार्यालये न राहता ती निश्चितच प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा देणारी केंद्रे होणार आहेत. मराठवाड्यातील एक कार्यालय भाजप कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा केंद्र होणार असून या ठिकाणाहून प्रत्येकाला निश्चित ऊर्जा मिळेल भाजपा रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी त्या दशकातील आपल्या प्रमोद महाजन असो किंवा मुंडे साहेब असो यांनी पक्षाच्या बाबतीत पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे याचा प्रचंड आनंद होत आहे. येणाऱ्या काळात नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भरघोस यश मिळवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम कामाला लागावे असे आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा