परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
नगरपरिषदेच्या निवडणूक तारखा जाहीर; २ डिसेंबरला होणार मतदान
२ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करायचे आहे. यानंतर मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नामनिर्देशन दाखल 10 नोव्हेंबर
अर्ज मुदत 17 नोव्हेंबर
अर्ज छाननी 18 नोव्हेंबर
अर्ज माघार 21 नोव्हेंबर
निडणूक चिन्ह 26 नोव्हेंबर
मतदान- 2 डिसेंबर
मतमोजणी - 3 डिसेंबर
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; दुबार मतदारावरही उचललं पाऊल
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी यासाठी मतदान होईल तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत १ कोटीहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे. ६८५९ सदस्य यातून निवडून येणार आहे. १४७ नगरपंचायती आहेत त्यापैकी ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. नगरपंचायतीत एका प्रभागात २ जागा असतात. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील. एका उमेदवाराला जास्तीत जास्त ४ प्रभागात अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. जर एखाद्याने जातवैधतेसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती लागेल. मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आहेत
नगर परिषद निवडणूक
६८५९ सदस्य, २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. राज्यात २४६ नगरपरिषदामध्ये १० नव्या नगरपरिषदांचा समावेश आहे. राज्यामध्ये १४७ नगरपंचायती आहेत. त्यापैकी ४२ ची नगरपंचायती निवडणूक होत आहे.ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. नामनिर्देशन पत्र संकेतस्थळ उपलब्ध असेल. अर्ज करताना जातवैधता प्रमाणपत्र नसेल तर निवडून आल्यानंतर सहा महिन्यात सादर करावे लागेल.
डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग
मतदारांच्या सोयीसाठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. मतदारांना त्यांचं नाव, मतदार केंद्र, उमेदवारविषयी माहिती मिळेल. गुन्हेगारी, शैक्षणिक, आर्थिक संपत्तीविषयी माहिती मिळू शकेल.
मतदार यादीच्या बाबतीत संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. एक यंत्रणेवर टूल विकसित केले आहे. नगरपरिषद, नगरपंचायत हे संभाव्य दुबार मतदार डबर स्टार आले आहेत. तिथे संबंधित अधिकारी मतदारांना संपर्क साधून कुठल्या प्रभागात, मतदान केंद्रावर मतदान करेल, याची माहिती...
इतर मतदान केंद्रात त्याला मतदान करता येणार नाही.
डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही. मतदान केलं नाही, किंवा दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येतील.
नगरपालिका निवडणूक कार्यक्रम
▪️अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५
▪️अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
▪️छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५
▪️माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
▪️अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५
▪️निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५
▪️मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५
▪️ मतमोजणी -3 डिसेंबर 2025
नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला!
२ डिसेंबरला मतदार ठरवणार नवा कारभार
आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी अखेर बिगुल वाजला असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शहरातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्यास सुरुवात १० नोव्हेंबरपासून होणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ अशी ठेवण्यात आली आहे. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी केली जाईल, तर माघार घेण्याचा अंतिम दिवस २१ नोव्हेंबर २०२५ असा असेल.यानंतर २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.
यावेळी शहरातील अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांमध्ये रंगणार सामना, तसेच विविध पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. नगरपरिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.स्थानिक प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाली असून, निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.
मुख्य टप्पे: अर्ज भरणे: १० ते १७ नोव्हेंबर
छाननी: १८ नोव्हेंबर
माघार: २१ नोव्हेंबर
मतदान: २ डिसेंबर
मतमोजणी: ३ डिसेंबर
शहर सज्ज, जनता उत्सुक — लोकशाहीच्या उत्सवाची पुन्हा एकदा तयारी सुरू! होणार असल्याने आता प्रशासनाची लगबग सुरू होईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा