परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी नगर परिषद निवडणूक : प्रभाग १ मध्ये महायुती उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महायुती नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व प्रभाग क्र.1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिपक मुंडे व भाजपचे उमेदवार सौ. वंदना अश्विनकुमार आघाव यांना मतदारांचा वाढता पाठींबा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम चांगलीच वाढली असून प्रभाग क्र. १ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, प्रभाग १-ब मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. दिपक प्रल्हादराव मुंडे आणि प्रभाग १-अ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. वंदना अश्विनकुमार आघाव यांनी मतदारांशी संवाद साधला. सर्व उमेदवारांना मतदारांची पसंती मिळत आहे.
प्रभाग क्र.1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिपक मुंडे व भाजपचे उमेदवार सौ. वंदना अश्विनकुमार आघाव तर नगराध्यक्षपदासाठी सौ. पदमश्री धर्माधिकारी यांना आम्ही आमचे मतदान रूपी आशीर्वाद देणार असल्याचे मतदार बोलुन दाखवत आहेत. प्रभागातील विविध भागात जाऊन केलेल्या प्रचार मोहिमेमुळे या उमेदवारांना मतदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. गाठीभेटीदरम्यान मतदारांनी आपापल्या अडचणी, प्रभागातील आवश्यक कामे तसेच विकासाच्या गरजा उमेदवारांसमोर मांडल्या. उमेदवारांनीही या मुद्द्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून भविष्यात विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. प्रभाग क्र. १ मधील उमेदवारानांच प्रचंड मताधिक्य देणार असल्याचा शब्द दिला आहे.
आ.धनंजय मुंडे आणि ना.पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून शहरात झालेल्या विविध कामांचा उल्लेखही प्रचारादरम्यान करण्यात आला. प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकासासाठी झालेली तरतूद आणि शहरातील प्रकल्पांवर झालेली प्रगतीही मतदारांसमोर मांडण्यात आली. प्रभाग १ मधील विविध भागांत उमेदवारांनी आयोजित केलेल्या बैठका, गाठीभेटी आणि संवाद कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांशी सातत्याने संवाद साधत असल्याने उमेदवारांची ओळख आणि विश्वास वाढत आहे. परळी नगर परिषद निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० ते सायं ५:३० या वेळेत होणार आहे. लोकांच्या मदतीला धावुन येणार्यालाच निवडुन देण्याचा मतदारांचा निर्धार मतदार बांधवानी केला आहे. त्यामुळे प्रभाग क्र. १ मधील उमेदवार यांचे पारडे जड झाले आहे. मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अडीअडचणी समजावून घेतल्या. आपले मत प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागाच्या उज्वल भविष्यासाठी...परळीच्या सर्वांगीण विकासासाठी वरील सर्व उमेदवारांना प्रचंड बहूमतांनी विजयी करा घड्याळ व कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा