परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
श्रीमती सुमनबाई गित्ते यांचे निधन; रमेशभाऊ गित्ते यांना मातृशोक
परळी (प्रतिनिधी) शहरातील स्नेहनगर येथील रहिवाशी श्रीमती सुमनबाई वैजनाथराव गित्ते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दि. २० नोहेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या ८० वर्षाच्या होत्या. एस. टी. कामगार संघटनेचे नेते रमेशभाऊ गित्ते यांच्या त्या मातोश्री होत्या. श्रीमती सुमनबाई गित्ते यांच्या पार्थिवदेहावर सार्वजनिक स्मशानभूमी परळी येथे सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीमती सुमनबाई गित्ते या धार्मिक सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग घेत असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या अंत्ययात्रेत डॉक्टर, वकील, पत्रकार, एस. टी कर्मचारी वर्ग, राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, आदी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी श्रद्धांजली वाहताना अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पश्चात १ मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. गित्ते कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे .
राख सावडण्याचा विधी श्रीमती सुमनबाई गित्ते यांचा राख सावडण्याचा विधी शनिवार दि. २२ नोहेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सार्वजनिक स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा