परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
राष्ट्रवादीच्या संध्याताई दिपक देशमुख यांचा परळी नगर परिषदेच्या प्रचाराचा धुमधडाका
शहरातील मतदारांच्या गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण
परळी वैजनाथ, प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार सौ.संध्याताई दिपक नाना देशमुख यांनी परळी नगर परिषदेच्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक प्रचाराचा धुमधडाका सुरू असून सौ.संध्याताई देशमुख यांनी परळी शहरातील सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण केली आहे.
परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पक्षप्रवेश केला होता. पक्षाच्या वतीने सौ.संध्याताई देशमुख यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे.त्यापूर्वीच दिपक देशमुख यांनी परळी शहरात आपला प्रचार सुरू केला होता.पक्ष प्रवेशा नंतर सौ.संध्याताई देशमुख यांनी परळी शहरातील सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी वर भर दिला.त्यांच्या सोबत कैसर शेख, फरजाना शेख,रोजाना शेख, उमा गर्जे,शिवकन्या भोसले,सीता
ताई हिंगणे,सावित्री करडे,सुमन साखरे,भाग्यश्री डांगे यांना सोबत घेऊन,शहरातील विविध भागात संवाद साधला व नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळालेल्या सर्व नगरसेवकांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा