परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 सोनाई अँग्रो कारखान्याचा आज पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ!




 ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - प्रा.टी.पी.मुंडे 

परळी वैजनाथ ,प्रतिनिधी... 

परळी तालुक्यातील माळहिवरा येथे उभारण्यात आलेला सोनाई अँग्रो अँड फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि. गुळ पावडर कारखान्याच्या पहिल्या गळीत चाचणी हंगामाचा(२०२५- २६) आज बुधवारी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३१ वाजता राज्यसभेचे खासदार तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. श्री.डॉ. भागवतराव कराड साहेब, ह भ प श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर, ह भ प श्री. विठ्ठल महाराज शास्त्री आळंदी देवाची, ह भ प अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, ह भ प श्री.तुकाराम महाराज शास्त्री, ह भ प श्री. भरत महाराज जोगी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोनाई अँग्रोचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रा.टी.पी.मुंडे सर, उपाध्यक्ष श्री. आत्मारामजी कराड, कारखान्याचे संचालक प्रा.विजय मुंडे, प्रदीप (बबलू) मुंडे व राहुल कराड यांनी केले आहे.


   सोनाई अँग्रो च्या पहिल्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री. मा. बापूसाहेब मोरे, मा .श्री. भरत गित्ते उद्योजक पुणे, मा.श्री. सचिनजी मुळूक जिल्हा प्रमुख शिवसेना, मा.श्री. दिगंबर महाडिक साहेब उपमुख्य सर व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय लातूर, मा.श्री.रविरंजन साहेब, मुख्य प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय लातूर, मा.श्री. नाथराव कराड प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी सेना महाराष्ट्र राज्य, मा. श्री. कृष्णकन्हैया साहेब शाखा प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबाजोगाई, मा.श्री.नितीन चेचानी सी.ए. छत्रपती संभाजीनगर, मा. श्री. चंद्रकांत गीते कॉन्ट्रॅक्टर अंबाजोगाई, मा.श्री. धनंजय देशमुख आर्किटेक डी एस इंजिनियर्स सोलापूर, मा. श्री. रामराव गीते कॉन्ट्रॅक्टर परळी वै, मा.श्री. शिवाजीराव मिसाळ साई श्रुती कंपनी पुणे, मा. श्री. सुनील सारडा सीए अंबाजोगाई, मा.श्री. ओमप्रकाश सारडा अध्यक्ष महेश बँक परळी,मा. श्री. के.एम. उपाध्याय मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बँक परळी वै, मा.श्री.नीतीन राऊत साई श्रुती कंपनी पुणे आणि मा.श्री.  रवि विश्वकर्मा संचालक साई श्रुती कंपनी पुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, खातेप्रमुख , विभाग प्रमुख, कर्मचारी ,कामगार व हितचिंतकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सोनाई अँग्रोचे संस्थापक अध्यक्ष व संचालकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!