परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा परळीतील बडा नेता शिवसेनेत !
भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी धनुष्यबाण घेतला हाती
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी वैजनाथ नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू असून या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. अनेक पक्षांतरे होत आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेल्या माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर परळीतील ज्येष्ठ नेते प्रा.टि.पी. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी येथील सभेत शिवसेनेत जाहीर प्रवेशकेला. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा परळीतील एक बडा नेता शिवसेनेत दाखल झाला आह.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळीतील नेते व भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिंदखेडराजा येथील सभेे तशिवसेनेत जाहीर प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालखी होत असून निवडणुकीचे वातावरण तापलेले आह. या तापलेल्या वातावरणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. या वेळची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक असून नगरपरिषदेवर ऐतिहासिक विजय मिळवायचा चंग महायुतीच्या नेत्यांनी बांधला आहे. परळी मध्ये भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस -शिवसेना- रिपाई व मित्रपक्ष सर्वांनी एकत्रित येत संपूर्ण महायुती केलेली आहे. तर महाविकास आघाडी एकत्रित बांधून ठेवण्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेतृत्वाला यश आले नाही. महाविकास आघाडीमध्ये समावेश असलेले प्रमुख घटक पक्ष परळीत स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहेत. महायुतीने मात्र या ठिकाणी एकत्रित ही निवडणूक हाती घेतली असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते फुलचंद कराड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांचा प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का मानला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा