परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

न्यायालयीन निर्णयाने वाढला उत्साह.....

वार्ड क्र. 14-ब मध्ये ‘चावी’ सौ. प्रतिभा रंगनाथ सावजी यांच्या हाती ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्र. १४-ब सर्वसाधारण महिला गटात अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या सौ. प्रतिभा रंगनाथ सावजी यांच्या उमेदवारीने संपूर्ण प्रभागात चांगलीच खळबळ माजवली आहे. ‘चावी’ हे निवडणूक चिन्ह आणि विकासाची चावी, प्रतिभाताईच्या हाती द्या हा प्रभावी संदेश मतदारांच्या मनात जोरदार ठसा उमटवत आहे.

सौ. प्रतिभा सावजी यांचा नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध घोषित केल्यानंतर, न्यायालयाने २४ नोव्हेंबर रोजी त्यांचा अर्ज वैध ठरवत मोठा दिलासा दिला. या निर्णयाने समर्थकांमध्ये प्रचंड आनंदाची लाट उसळली असून आता प्रभागात सर्वत्र चावीच जिंकणार, अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. सौ. प्रतिभा सावजी यांनी वार्डातील सर्वसामान्य महिला, कामगार, विधवा, ज्येष्ठ नागरिक, तरुणी आणि घरगुती समस्यांशी झुंज देणाऱ्या कुटुंबांना केंद्रस्थानी ठेवून विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यात प्रमुख उपक्रम लाडकी बहीण योजनेत खाते उघडून देणे, नवीन/हरवलेली रेशनकार्डे तातडीने उपलब्ध करून देणे, महिलांसाठी दिवसेंदिवस येणाऱ्या सरकारी योजनांचे मोफत मार्गदर्शन, प्रत्येकाच्या सुखदुःखात स्वतःची उपस्थिती, वार्डातील महिलांना स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, मतदारांमध्ये यामुळे मोठा विश्वास निर्माण झाला आहे.

     प्रभागातील तरुण मतदार सौ. प्रतिभाताईंच्या योजनांनी प्रभावित झाले असून ते दारोदार संपर्क मोहीम राबवत आहेत. आम्हाला बदल हवा आहे. प्रभाराला नवी दिशा देण्यासाठी चावीच योग्य पर्याय, असे अनेक तरुण म्हणत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामगार वर्ग यांच्यात त्यांच्या साधेपणामुळे व प्रामाणिक संवादामुळे चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. प्रगतीच्या वाटेत अडथळे अनेक… पण विकासाची चावी आहे एक! वार्डाच्या भविष्यासाठी घ्या योग्य निर्णय — चावीला द्या प्रचंड पाठिंबा! बदलाची नवी पहाट… प्रतिभाताईंची चावी घेईल विकासाची उंच झेप! प्रभागात ही घोषवाक्ये जोरात वाजत असून लोकमताचा कलही तसाच पाहायला मिळतोय. 

रंगनाथ सावजी यांच्या जनसंपर्काचा होणार फायदा

          सौ. प्रतिभाताईंचे पती रंगनाथ सावजी हे सक्रीय कार्यकर्ते असून त्यांचा परळी शहरातील  संपर्क आणि ओळख याचा फायदा निवडणूकीत होणार आहे.अनेक वर्षे सामाजिक, राजकीय आणि लोकसहभागाची कामे करून त्यांनी सर्व स्तरातील नागरिकांशी संवाद ठेवला आहे. विकास म्हणजे रस्ते, पाणी, गटारच नव्हे… विकास म्हणजे लोकांशी नातं जपणं आणि प्रत्येक गरजवेळी त्यांच्या पाठीशी उभं राहणं, हे सावजी दाम्पत्य आपल्याला दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

‘चावी’ चिन्ह का महत्त्वाचे?

चावी म्हणजे... नव्या संधीचं दार… प्रगतीचे कुलूप उघडण्याची ताकद… आणि समस्यांवर योग्य उपाय शोधणारी किल्ली! प्रभागात अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या समस्या पिण्याच्या पाण्याचे संकट, मलनिस्सारण व स्वच्छतेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, वाढता नागरिक त्रास, महिलांसाठी सुरक्षितता व सुविधा अपुरी. या सर्व समस्यांवर प्रतिभाताईंनी मोहीम राबविण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.

न्यायालयीन निर्णयाने वाढला उत्साह 

           सौ. प्रतिभाताईंचा अर्ज अवैध ठरवल्यानंतर त्या माघार न घेता थेट कोर्टात उभ्या राहिल्या. कोर्टाने अर्ज वैध ठरवून त्यांना न्याय दिला. मतदारांचे म्हणणे ज्याच्याकडे धैर्य आणि न्यायासाठी लढण्याची ताकद आहे, तीच महिला आपल्या हक्कांसाठीही लढेल! ही उमेदवार डगमगली नाही, म्हणून आम्हीही चावीवर ठाम आहोत! हा कोर्टाचा निर्णय त्यांना अधिक सहानुभूती आणि पाठिंबा मिळवून देत आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!