परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
विकासाभिमुख नेतृत्वाला पुन्हा संधी देण्यासाठी आम्ही वचनबद्ध - भावसार समाजाने महायुतीच्या उमेदवारांना दिला शब्द
सौ. पद्मश्री धर्माधिकारी, प्रा. पवन मुंडे, डॉ. पुजा तोतला यांच्या प्रचाराला सुरुवात
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ नगर परिषद निवडणुकीतील भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री धर्माधिकारी, प्रभाग क्रमांक 14 मधील महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रा. पवन मुंडे, डॉ. पूजा तोतला यांच्या प्रचाराला आज श्री हिंगलाज माता मंदिरात श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात. शहराच्या विकासासाठी बांधील असलेल्या विकासाभिमुख नेतृत्वाला पुन्हा संधी देण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत असा शब्द शहरातील सर्व भावसार समाजाच्या प्रतिनिधींनी महायुतीच्या उमेदवारांना दिला.
महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री धर्माधिकारी, प्रभाग क्रमांक 14 मधील महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रा. पवन मुंडे, डॉ. पूजा तोतला यांच्या प्रचाराला आज शंकर पार्वती नगरमधील श्री हिंगलाज माता मंदिर येथून सुरुवात करण्यात आली भावसार समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची यावेळी बैठक घेण्यात आली. माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी प्रभाग 14 मधील उमेदवार प्रा. पवन मुंडे, डॉ. पूजा प्रितेश तोतला यांच्या उपस्थितीत हिंगलाज मातेला उमेदवार व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भावसार समाजाची व्यापक बैठक झाली. शहराच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील आणि बांधील असलेल्या उमेदवारांनाच निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या उच्चशिक्षित आणि विकासाची जाणीव असलेल्या उमेदवार आहेत तर प्रा. पवन मुंडे यांनी समाजाच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी अनेक कामे केली आहेत. डॉ. पूजा तोतला याही विकासप्रिय असल्यामुळे या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी समाज बांधवांनी काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भावसार समाजाचे जेष्ट नेते सुधार्मा सद्रे, भावसार समाज अध्यक्ष प्रभाकर हजारे, हिंगलाज माता मंदिरचे ट्रस्ट अध्यक्ष गोपाळराव तांदळे, युवक अध्यक्ष विलास सुत्रावे, भावसार समाजाचे उपाध्यक्ष विष्णुपंत क्षीरसागर, संजय सेवलकर, शरद खेडकर,नितीन वायचळे, संतोष खेडकर, सुधाकर तांदळे, शंकर गर्जे, प्रमोद पाखरे, कृष्णा बेदरकर, सुजित बंडे,कैलास पतंगे, सुदाम बर्डे, दत्ता सदरे,सतीश सरोदे, जय हंबीरे, प्रसाद गरुड, मनोज वायचळे,कृष्णा नवनाथ बेदरकर, गोविंद बर्डे, धनंजय सरोदे, गोपाळ कंकाळ आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा