परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळीतील टोकवाडी येथे कापूस गळीत हंगामाचा शुभारंभ शेतकऱ्याला मिळाला सर्वोच्च भाव ₹७३०१ प्रती क्विंटल
परळी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत हंगाम २०२५–२६ ला प्रारंभ
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
आज दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्था मर्या., परळी वैजनाथ यांच्या जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी, टोकवाडी येथे कापूस गळीत हंगाम २०२५–२६ चा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
या हंगामाच्या शुभारंभप्रसंगी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. सूर्यभान नाना मुंडे यांच्या हस्ते . शेतकरी म्हणून सतीश बनसोडे (रा. नागापूर) यांचा कापूस खरेदी करण्यात आला असून त्यांना तालुक्यातील सर्वोच्च भाव ₹७३०१ प्रती क्विंटल देण्यात आला.
या प्रसंगी जिनिंगचे संस्थापक अध्यक्ष व कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळंके, जिनिंगचे उपाध्यक्ष ॲड. एन. जी. देशमुख, बाजार समितीचे मुख्य लेखापाल गोविंदभाऊ मुंडे, बाजार समितीचे संचालक ॲड. रणजीत सोळंके, तसेच तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बालासाहेब गणपत सोळंके, नागापूर येथील जेष्ठ नागरिक मा. चंद्रभान सोळंके, माणिक आप्पा सोळंके (मुकादम व सावकार), ज्ञानोबा माऊली देशमुख, दिलीप दादा सोळंके, मा. चेअरमन बाबासाहेब सोळंके, जेष्ठ शेतकरी नेते कैलास सोळंके, सुंदरराव सोळंके, तसेच हमाल-मापाडी संघटनेचे अध्यक्ष अंगदराव मुंडे, मापाडी दिनकर मुंडे व जिनिंगचे व्यवस्थापक सुरज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या शुभारंभ सोहळ्याचे प्रास्ताविक आणि शेतकऱ्यांचे तसेच मान्यवरांचे आभार सत्यजित सोळंके यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा