परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
वार्ड क्र. 11 मधून यशपाल वाघमारे यांच्या नावाची जोरदार चर्चा
परळी / प्रतिनिधी :
परळी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी आता जोर धरू लागली असून विविध प्रभागांत इच्छुकांच्या नावांवर चर्चा रंगत आहे. वार्ड क्र. 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते यशपाल वाघमारे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
यशपाल वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेत सक्रिय असून सामाजिक, शैक्षणिक व जनसंपर्क क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. स्थानिक पातळीवर युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आणि जनआधार असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी वार्डातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून होत आहे.
वार्डातील स्थानिक समस्यांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून नागरिकांशी सलोख्याचे संबंध टिकवले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत वार्ड क्र. 11 मधून यशपाल वाघमारे हे एक बलाढ्य दावेदार ठरतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा